शिवाजीनगर भागातील होमी भाभा इस्पितळ तातडीने सुरू करा,आप ची मागणी

पुणे दि.19- मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे भागातील होमी भाभा प्रसुती गृहाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावी अशी मागणी  पुणे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांना आम आदमी पार्टीने  निवेदनातून केली आहे.

गेल्या पाच वर्षातील सुरुवातीच्या काळात निधी नसल्यामुळे भवन विभागातर्फे दिले जाणारे बांधकाम रखडले होते. आणि आता लिफ्टच्या जागेचे बांधकाम चुकीचे झालेले असल्याच्या कारणाने अजूनही लिफ्ट बसवली गेलेली नाही. भवन विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे अजूनही दोन मजले सद्या वापरात नाहीत. या दिरंगाई ला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आपने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

मोठ्या लोकसंख्येच्या पुणे शहरासाठी तातडीच्या प्रसुती शस्त्रक्रियांसाठी केवळ एक हॉस्पिटल असणे ही पुणे शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे. इमर्जशी प्रसूतीच्या ऑपरेशनची सोय केवळ कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये केली जाते. पण बऱ्याचदा तिथे जागा मिळणे अशक्य असते. त्यामुळे रुग्णांना तातडीच्या प्रसूतीसाठी नाविलाजाने खाजगी रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागते

म्हणून या भागातील गोखलेनगर, जनवाडी तसेच व पाटील इस्टेट, वैदुवाडी या सर्वच भागातील गरीब महिलांना हा हि बाब असून अडचण नसून खोळंबा अशी अडचणीची बाब ठरत आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसूतीसाठीच्या सोयीसुविधा भाभा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्यास या भागातील खासगीमध्ये होणारा आर्थिक नुकसान होणार नाही.

या भागातील माजी नगरसेवक,आमदार शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षात या संदर्भात काहीही हालचाल केलेली नाही. दोन मजले अजूनही उपयोगात नसून तिथे पूर्ण सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

यावेळी सोबत आप चे सतीश यादव, अमोल मोरे, शंकर थोरात आदी उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने