सम्राट अशोक बुद्ध विहार साईनगर कोंढवाच्या वतीने वर्षावास समाप्ती निमित्य बुद्ध धम्म संदेश रथ रॅली काडून वर्षावास समाप्ती करण्यात आली .

पुणे कोंढवा - अश्विन पौर्णिमा रोजी वर्षावास समाप्ती निमित्य सम्राट अशोक बुद्ध विहार साई नगर कोंढवा पुणे येथे गुरुवार दि.17 रोजी रात्री  बुद्ध धम्म संदेश रॅली काढण्यात आली.

येथील सम्राट अशोक बुद्ध विहार व त्रिरत्न सोशल फौंडेशन च्या वतीने अश्विन पौर्णिमा रोजी वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम पार पडला. आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने विहारात वर्षावास कार्यक्रम सुरु होता.

तथागत भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधःकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञा च्या प्रकाशा मध्ये आणणारे ज्ञान पेरले. जसे विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही. तसाच बुद्धचा धम्म आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे आहे. त्रिशारण पंचशील पाळणे म्हणजेच बुध्दाचा धम्म आचरणात आणणे होय.

आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमे पासून अश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास सुरु असतो. वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमे पासून तीन महिन्याच्या वर्षावासास सुरवात होते. वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे.

चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा 


वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास.

पावसाळ्याचे तीन महिने भिक्षुना धर्मप्रसार करण्यासाठी येथून थेथे प्रवास करणे त्रासदायक होवू नये. पावसाळ्यात (साप, विचू, वीज वारा) विषारी प्राण्यापासून इजा होवू नये म्हणून त्यांनी या तीन महिन्याच्या काळात विहार स्तूप येथे मुक्कामी राहून येथील उपासकांना धम्माचा उपदेश करावा. अशी त्या मागची मुख्य भूमिका आहे.     

यावेळी विहारात नियमित रात्री बुद्ध धम्म वदंना, ग्रंथ वाचन आणि एक दिवस भन्तेजी यांचे धम्म प्रवचन पार पडले. दि.17ऑक्टोबर रोजी वर्षावास समाप्ती शेवट दिन असल्याने साई नगर कोंढवा पुणे परिसरात रात्री साडेसात ते 9 यावेळेत बुद्ध संदेश धम्म रॅल काढण्यात आली.

यावेळी सर्व बौद्ध उपासक,उपासीका व बालक सर्वांनी  पांढरे वस्त्र परिधान करून रॅलीत सहभाग घेतला. रॅली नंतर सहभोजनाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

यासाठी विहाराचे जेष्ठ आधारस्तंभ त्रिरत्न सोशल फौंडेशन चे अध्यक्ष भागवत पालखे, उपाध्यक्ष आप्पा तळेकर, सचिव सागर कांबळे,  राम आखाडे, दिनेश झेंडे, मल्लीनाथ गुरवे ,अनंत सरोदे, शिवाजी झेंडे, दत्तात्रय ब्रहमे, गंगाराम नडगिरे, बापू शिंदे, आप्पा पालखे डॉ.शिरूमल शेंडे, रामचंद्र भालेराव , वसंत करमणकर दत्ता सुतार, दत्तू हजारे,यासह अनेक उपासक उपासकांनी रॅली यशस्वीतेसाठी योगदान दिले.परिश्रम घेतले.



Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने