पुणे दि,६जानेवारी:
भारतीय जनता पार्टी पुणे केंटॉमेन्ट मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलल्या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत ससून रुग्णालयात बी जे कॉलेज च्या मदत कक्ष उद्धाटन कार्यक्रमानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी दि ५जानेवारी रोजी अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वाद्यकीय मदत कक्षाचे उदघाटन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमा नंतर जिन्यावरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचाऱ्यास कानशिलात मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.यासंदर्भात त्यानंतर आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.