शाळेला गावाचा आणि गावाला शाळेचा अभिमान। .

आलूर दि.६, लकी गुरवे यांजकडून-  

आलूर ता उमरगा  येथील जि.प.प्रा. शालेय व्यवस्थापन कमिटी गठीत करण्यासाठी पालक मेळावा घेण्यात आले.या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव पाटील होते.  

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.प्रास्तविक करताना मुख्यध्यपक श्री पाटील यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. व प्राथमिक मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009 या प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना समितीचे अधिकार  व कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.एकमताने समितीची निवड केली.

यावेळी एकमताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणुन विद्यमान अध्यक्ष श्री शट्टप्पा शिवानंद धुत्तर्गे व विद्यमान उपाध्यक्ष श्री अनिल रेवणसिध्द मरबे यांची फेरनिवड करण्यात आली तर सदस्स म्हणून 1) श्री हणमंत मलेशप्पा बिराजदार. 2) श्री सोमिनाथ सुरेश ब्याळीकुळे. 3) सौ.ताराबाई भिमाशंकर काशट्टे. 4) सौ.नजमा अब्दुलरहेमान पठाण. 5)सौ. श्रीदेवी महेश इरकल. 6)सौ.सिताबाई संतोष पारडे. 7) सौ.बटगेरी ताई.8) श्री संजय भिमाशंकर सावरगे. 9) श्री महादेव शरणप्पा तळीकर.10)श्री शिवानंद बंडप्पा लाटे.11) श्री संजय चिंतामणी कासार.यांची निवड घोषित करण्यात आली.

या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य यांचे शाळेतर्फे स्वागत सत्कार करण्यात आले.पालकांनी शाळेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व गावातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे असे पालकांनी बोलताना सांगितले.

या मेळाव्यासाठी स.शि.श्री मोहन पुंडकरे, श्रीमती शर्मिला अष्टगी,श्रीमती श्रीदेवी घोडके व श्री नित्यानंद खद्दे व स्वयंसेवक श्री गणेश मिरजे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री नित्यानंद खद्दे यांनी केले.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने