पुण्यात कॉंग्रेस कार्यकत्यांनी हातात कोंबडी आणि निषेधाच्या घोषणा देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा केला निषेध

पुणे दि,१४- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतंच हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय ? असे वादग्रस्त  वक्तव्य केल्याने त्यांनी शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे, तो आम्हीं खपवून घेणार नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या विरोधात पुण्यात शहर काँग्रेस पक्षातर्फे दि,१४ रविवारी आंदोलन आणि  निषेध करण्यात आले.

पुण्याच्या बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी हातात कोंबडी व निषेध फलक घेवुन मंत्री राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तिव्र आंदोलन  केले. यावेळी कांही  प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणात रोष व्यक्त करताना मंत्री राणे यांचा त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेत नोंदवला.

यावेळी पुणे काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी,मा महापौर कमलताई व्यवहारे, पूणे शहर महिला अध्यक्षा पूजा आनंद,

महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी,मा नगरसेवक अजित दरेकर,मा नगरसेवक रफिक शेख, लतेंद्र भिंगारे,द.स.पोळेकर,अशिष गुंजाळ, देवदास लोणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने