वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालय समोर जीवघेणा हल्ला

पुणे, दि. १६  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर ससून रुग्णालयसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करून पुणे स्टेशन च्या दिशेने पळुन गेल्याचे वृत्त आहे.

या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ही घटना सोमवारी दि. १५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पुण्यात नुकताच शरद मोहळ चा दिवसाढवळ्या झालेला खून असे गुन्हे गारी कृत्य समोर येत असल्याने जनतेत खळबळ उडाली आहे.
याचे सविस्तर वृत्त असे की,प्रफुल्ल गुजर ससून रूग्णालयात वास्तवास असून, मागिल अनेक वर्षांपासून तो रुग्णसेवा करीत आसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तो सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मित्रांसह ससून रूग्णालयाच्या गेटसमोर चहा घेण्यासाठी थांबलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गुजर त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 
या हल्ल्यात गुजर स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाल्याने ते थोडक्यात बचावले परंतु यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अज्ञात हल्लेखोरां विरुद्ध बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुडील तपासबंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने