पुणे दि, १४- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावरील चार महिन्यांचे चहापानाचे बिल दोन कोटी 38 लाख रुपये आले आहे असे मागील वर्षी माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाल्यावर 'सरकार या चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का?' असा कडवट सवाल तेव्हाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विचारला होता. आता तेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर हा चहा त्यांना ही गोड वाटू लागलेला दिसतोय अशी टीका आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
विरोधी पक्षात असताना विकास कामांपेक्षा सरकारी उधळपट्टी वाढली आहेत आणि तो खर्च कमी करण्यासाठी नोकर भरतीच्या ऐवजी कंत्राटी भरती करावी व इतरही उपाय अवलंब व्हावे असे सांगणारे अजित दादा पवार यांच्या निवासस्थानावरती होणाऱ्या चहापानाच्या खर्चासाठी आता दीड कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भातील आदेश 3 जानेवारी 2024 रोजी काढण्यात आला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने एप्रिल 2023 पासून दोन वर्षासाठी लागू करण्यात आला आहे. दादांच्या निवासस्थानीपण चहापाण्यासाठी दीड कोटी मंजूर (पूर्वलक्षी एप्रील २३ पासून शासन आदेश दि ३/१/२४)
सरकारी शाळांमध्ये निधी नाही म्हणून पालकाने माजी विद्यार्थ्यांकडे निधी मानणारे, शाळाच दत्तक देणाऱ्या सरकारला चहा पाण्यावर खर्च करण्यासाठी मात्र पैसे आहेत असे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरच्या चहापाण्यासाठी साडेतीन कोटी रुपये चा निधी तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानासाठी सुद्धा चहापाण्यासाठी दीड कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झालेले आहेत. त्यावेळेस अजितदादा विरोधी पक्षात होते व त्यांनी या उधळपट्टीवरती खरपुस टीका केली होती. परंतु आता स्वतःच उपमुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांच्या स्वतःच्या बंगल्यावर चहापाण्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर सोन्याचा अर्क घातलेला चहा सुद्धा अजितदादाना गोड लागू लागला आहे. या निवडणुकीच्या वर्षामध्ये अजितदादा जरी पुणे बारामती दौरे करत असले तरी कार्यकर्त्यांना मात्र बंगल्यावर चहा सोबत चिकन सँडविच, बिर्याणी, पावभाजी अश्या विविध चमचमीत पदार्थाची सोय असणार आहे.
जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचा हा सर्व प्रकार म्हणजे पुरेसा बाजारभाव मिळत नाहीत म्हणून शेतावर नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमानच आहे असेही आप चे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.
शासन परिपत्रक:-