राजमाता जिजाऊ भोसले जयंती निमित्त मुनोत विद्यालयात कार्तिकेय सामाजिक संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा घेवून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले


कात्रज/कोंढवा : दि, ११- (गुरवे मल्लीनाथ यादव)

कार्तिकेय सामाजिक संस्था कोंढवा यांच्यावतीने शिव जयंती महोत्सव 2024 निमित्त मुनोत विद्यालय कात्रज येथे निबंध घेवून विजेत्यांना बक्षीस वितरण गुरुवारी दि.११ जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी कर्तेकिय सामाजिक संस्थेच्यावतीने शाळेच्या मुख्यध्यपिका यांच्याकडे भारतीय संविधान प्रत भेट दिली.

 मुनोत विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा. नगरसेविका नंदाताई लोणकर, मराठा सेवा संघाचे शिवश्री राजेंद्र कुंजीर,माजी शिक्षण मंडळ सदस्य नारायण लोणकर, मुनोत विद्यालय संस्थापक अशोक मुनोत, सहकार पतसंस्थेचे अध्यक्ष अमोल धर्मावत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कार्तिकेय सामाजिक संस्था सदस्य जाकीर नदाफ,विमल नंबियार, मल्लिनाथ गुरवे, मुनोत शाळेच्या मुख्यध्यापिका सुरेखा सुतार मँडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने