ढोल बजाओ आंदोलनामुळे जिल्हाधिकारील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
पुणे - प्रतिनिधी : रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने धर्मादाय हॉस्पिटल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय समोर ढोल बजाओ आंदोलन व जोरदार निदर्शने रुग्ण परिषदेचे अध्यक्ष श्री उमेश चव्हाण यांच्या नेत्रत्वात करण्यात आली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, अनिल गायकवाड, कविता डाडर, रवींद्र चव्हाण, नितीन चाफळकर, प्रभा अवलेलू, अर्चना म्हस्के, किरण कांबळे, झुंबर म्हस्के, मंदा साठे, जैनुद्दीन शेख, धनंजय टिंगरे, राजाभाऊ कदम, रोहिदास किरवे, संतोष चव्हाण, दिनेश गजधने, शंकर रोकडे व अनेक रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुग्ण परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, "पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोफत उपचारांसाठी रुग्णालयांना पत्र देण्यात येते, मात्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर पत्र बघितल्यानंतर रुग्णांना प्रचंड वाईट व अपमानाची वागणूक धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मिळते ही बाब लक्षात घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
तर पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांची पिळवणूक होते. आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचारांची विनंतीद्वारे मागणी केली असता रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप दिला जातो. हॉस्पिटल मधून जबरदस्ती डिस्चार्ज घ्यायला भाग पाडले जाते. आशा रुग्णालयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हॉस्पिटलचे इस्टिमेट, रुग्णाचा फोटो ई. कागदपत्रे सादर केल्यानंतर सह धर्मदाय आयुक्त कार्यालयाने तातडीने धर्मदाय रुग्णालयांना मोफत उपचारांकरिता लेखी आदेश पारीत करावेत.
महागाईच्या काळामध्ये दोन-तीन लाख रुपयांचे बिल भरणे अवघड झालेले आहे. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण, आणि फुफ्फुस प्रत्यारोपण यासारखे गंभीर रुग्णांवर आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचार मिळावे यासाठी तातडीने गंभीरपणे तात्काळ अंमलबजावणी करावी.
आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचार देण्यास नकार देणाऱ्या हौस्पिटल चा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Tags:
रूग्णहक्क परिषद पुणे