स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत राज्य राखीव पोलीस बल गट ९ पुणे येथे गट मुख्यालयात 'हर घर तिरंगा झेंडा' उपक्रम आयोजित करण्यात आला. तसेच ७५ कि.मी. अमृत महोत्सवी दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले. त्यामध्ये ०३ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

पुणे - ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत राज्य राखीव पोलीस बल गट ९ पुणे येथे गट मुख्यालयात 'हर घर तिरंगा झेंडा' उपक्रम आयोजित करण्यात आला. तसेच ७५ कि.मी. अमृत महोत्सवी दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले. त्यामध्ये ०३ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. 



पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थांना गट मुख्यालयात व विविध शाळेमध्ये जावून शाळकरी मुलांकरीता अत्याधुनिक शस्त्र प्रदर्शन, रारापो बलाची ओळख, भरती प्रक्रिया याची माहिती देण्यात आली. फ्रिडम मार्च, गट परीसरात पायी रॅली कडून सर्व शाळकरी मुलांना खाऊचे वाटप केले. पुणे शहर परीसरामध्ये विविध नागरीकांसाठी बन्ड डिस्प्लेचे आयोजन करण्यात आले.

श्री.संदीप दिवाण, भाषोसे, समादेशक, रारापो बल गट ९ पुणे व त्यांचे कुटुंबिय यांचे शुभहस्ते दि.७ अगस्ट रोजी फ्लॅग सिंग्नल दाखवुन सायकल रॅली  काढण्यात अली. या सायकल रॅलीच्या आयोजना मध्ये १२५ पोलीस अधिकारी व अंमलदार, कुटूर्बिय व त्यांचे पाल्य यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविलेला.

गट परिसर व फातीमानगर परीसरात अपृत महोत्सवी सायकल रॅली काढण्यात आली. वडाची वाडी येथे श्री.संदिप दिवाण, समादेशक यांचे शुभहस्ते तसेच टाटा अँटोकॉम सिस्टीम्स अँड टेर पॉलीसी यांचे सोजन्याने ३००० वक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

गट परीसरात गट-रूग्णालय येथे ससुन सर्वोपचार रूग्णालय पुणे यांचे सोजन्याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चांगला प्रतिसाद नोंदविला. पोलीस अधिकारी अंमलदार वर्ग ड कर्मचारी ब त्यांचे कुटुंबीय वांचेकरीता गटरूग्णालय मार्फत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

तर गटपरीसरात ३१९ एकर परीसरात स्वच्छता अभियान सर्व अधिकारी अंमलदार, वर्ग ड त मंत्रालयीन कर्मचारी यांचे उपस्थितीत राबविण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मुलांसाठी हाकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल व बडपिंटन स्पर्धा खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कुटूंबिय महीलांसाठी रांगोळी व मुलांसाठी वकृत्व स्पर्धाचे आयोजन करून विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीसांचे वाटप करण्यात आले. 

सदर कार्याक्रमासाठी श्री संदीप दिवाण, रारापोबल, गट ९ पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाकरीता श्री. एस.एन सय्यद, सहायक समादेशक, श्री. दिलीप खेडेकर, समादेशक सहायक, पोलीस उपअधिक्षक फोर्स बन श्री संतोष गायके, पोनि जाधव, तल्लुर, पोउपनि शिवाजी लावंड, मिलींद तायडे, दिपक सिसोदिया, वैदयकिय अधिकारी श्री. तोडमल, असई प्रविण मोरे, पांडुरंग टिंगरे, राहुल काळखेरे, पोहवा राहुल लिपण, संदेश मोरे, सुनिल पाटील व प्रशिक्षक ब पोलीस अंमलदार यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन विशेष वोगदान दिले. 


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने