१८ मुली, १८ संघर्षमय कहाण्या सन्मान सावित्री - फातिमांच्या लेकींचा

पुणे – 8 मार्च 2022 रोजी महिला दिना निमित्य  लोकायत नागरी समिती तर्फ़े ‘सन्मान व सत्कार सावित्री-फ़ातिमांच्या लेकींचा’ या कार्यक्रमात १८ मुलीनी, १८ संघर्षमय कहाण्या सांगून समाजाकड़ून कांही अपेक्षा प्रश्न, आणि स्वता मध्ये बदल करून यशस्वी होण्याचा कनमंत्र कथन केला गेला.

क्रिकेट, पॉवरलिफ़्टिंग, वेटलिफ़्टिंग, हॉकी इ. खेळांमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळलेली बिल्किस शेख,
अत्यंत गरिबीतुन शिकत इटली व अमेरिकेतून स्कॉलरशिप घेत पदवी मिळविलेेली सध्या घोरपडी पेठेत सरकारी शाळेत मुलांना शिकव असलेली प्रियंका पाटील. आशा  ८ मुली आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीशी झगड्णा‍र्‍या १८ कहाण्या यावेली कथन केल्या गेल्या.

गंजपेठ, लोहियानगर, मोमीनपुरा, भागातील किक बॉक्सिंग, जिम ट्रेनर, हॉकी, क्रिकेट, धनुविर्द्या, कराटे, वाणिज्य, कायदा, वैद्यकीय, अभियंता अशा विविध  क्षेत्रात नैपुण्य मिळालेल्या मुलींना सावित्री-फातिमां यांच्या  प्रतिमा देवुन सत्कार करण्यत आला.
 
यावेळी प्रियंका पाटील यांनी कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोन असतात. असे सांगूनपहिला दृष्टिकोण  पारंपरिक म्हणजे रोजच आयुष्य जगणारा आणि दूसरा दृष्टिकोण म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडवणारा असतो. 
त्यामुळे जो पर्यंत रोजच्या आयुष्याच्या बाहेर जाऊन अपन विचार करून आपला इतिहास जाणून घेनार नाही तोपर्यन्त बदल होणार नाही असे मत व्यक्त केले. 

स्नेहल हणुमंते म्हणाल्या की, "घरातील व समाजातील लोक काय बोलतील याचा विचार आपण विशेषत: स्त्री म्हणून खूप  करतो.म्हणुन या विचारात आपणच आपली जास्त गुंतागुंत करून घेतो. यातून जेंहा अपण बाहेर पडू, तेव्हाच माणूस म्हणून काहीतरी करू शकू असा अनुभव कथन केला.


कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन मार्गदर्शनात ॲड. शारदा वाडेकर यांनी महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल छान दिसणं, नटण या पलीकडे जाऊन स्वत:ला पाहायला पाहिजे. मी माझ्या घरातल्या बाईंना समानतेने वागवलं पाहिजे असा संकल्प सर्व पुरुषांनी घेतल पाहिजे अस परखड मत मांडले.

सैन्याच्या प्रशिक्षणादरम्यान असलेली स्त्री-पुरूष समानता आयुष्याच्या ट्रेनिंगमध्ये का आणली जात नाही? असा प्रश्न कष्टकऱ्यांचे नेते नितीन पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
 महात्मा फ़ुले पेठमध्ये सावित्री-फ़ातिमांचा आणि त्यांची शिष्य़ा मुक्ता साळवेंचा अन्यायविरोधात असलेला संघर्षाची आठवण करून देण्यासाठी महिलादिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रास्ताविक करताना नीलिमा तारा सुरेश यांनी केले.

भारतीय स्वातंत्र लढ्यातील मिराबेन, आबदी बानू बेगम या स्त्रियांच्या कथांचेही वाचन वस्तीतील स्थानिक महिलांनी केले.

यावेळी कलावती तुपसुंदरे, ॲड.मोनाली अपर्णा उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सतीश पाईकराव यांनी केले. आभार मानव नेटके यांनी मांडले. संविधानाचे प्रास्ताविक वाचून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post