केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सातत्याने होत असल्याच्या निषेधार्थ. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार दि. १९/१०/२०२१ रोजी सायं. ४.०० वा. सेवन लव्हज चौक, शंकरशेठ रोड, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे म्हणाले, "अच्छे दिनचे गाजर देवून केंद्रात आलेले मोदी सरकार सतत पेट्रोल, डीजेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करत आहे. ऐन दिवाळीत इंधनांची व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून मोदींनी जनतेचे दिवाळे काढले आहे.
सरकारच्या या जनताविरोधी नीतीच्या विरोधात आजचे हे आंदोलन आहे. जोपर्यंत ही भाववाढ कमी होत नाही तोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू राहील.
आज आमच्या महिला भगिनीं त्रस्त झाल्या आहेत. त्या पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत तर एकीकडे नागरिक पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे स्वतःच्या गाड्या विकू लागले आहेत. ही बाब दुःखद आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित भाववाढ मागे घ्यावी अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ही जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही."
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक केला तर कार्यकर्त्यांनी आपल्या मोटारसायकल विकायला काढल्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. ऍड.अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. संजय बालगुडे, नगरसेवक मा. आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, माजी नगरसेवक मा.दत्ताबापू बहिरट, मा. वीरेंद्र किराड, नगरसेविका मा. लता राजगुरू, नगरसेवक मा. अविनाश जी बागवे, नगरसेवक मा. रफिक शेख, मा. रमेशजी अय्यर, ब्लॉक व सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.