कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचे काम महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. असे मत ना मोहन जोशी यांनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रक्तदान शिबीरात बोलताना व्यक्त केले .


पुणे-कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचे काम काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केले.
असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन दादा जोशी यांनी मांडले.
दि.१७ ऑक्टोबर रोजी जय जंगली महाराज प्रतिष्ठानच्या सौजन्याने व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस घनश्याम भगवानराव निम्हण यांच्या वतीने शिवाजीनगर च्या रोकडोबा मंदिर सभागृहात अमिताभ बच्चन यांच्या 79 व्या वाढ दिवसानिमित रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात माजी मंत्री रमेश दादा बागवे मोहनदादा जोशी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.रमेश दादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मा.मोहन दादा जोशी,नेते दत्ता बहिरट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस सरचिटणिस मा.देवदास द.लोणकर,पत्रकार मा.मल्लिनाथ गुरवे.पत्रकार सुधीर भगत तसेच काँग्रेस नेते,पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थिती होती.
शिवाजी नगर च्या काँग्रेस भवन जवळील रोकडोबा मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या  रक्तदान शिबिराचे रक्त संचलन ची जवाबदारी पूना ब्लड बॅंक च्या वैद्यकीय टीम ने उत्तम रित्या पार पाडली.

दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व इतर अमिताभ बच्चन चाहत्यांनी शिबिरास भेटी देऊन अमिताभ बच्चन यांचे चाहते निम्हण यांचे कौतूक आणि प्रशवंशा केली.



Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post