ख्रिश्चन धर्मगुरु राइट रेव्हेरेंड बिशप डॉ थॉमस मॅन्युएल डाबरे यांचा वाढदिवस आणि धार्मिक सेवेचे 50 सुवर्ण वर्षा च्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
ख्रिस्ती धर्म गुरू बिशप यांचा 24 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस होता. व त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या सेवेला पलकीय सेवा कार्या ला वाहून घेतले त्याला 50 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्याने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा खास पुणे दौरा- आयोजक ऑल इंडिया ख्रिश्चन काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मॅन्युएल डिसोझा यांच्या प्रयत्नातुन झाला.
संक्षिप्त परिचय-
बिशप डॉ. थॉमस डाबरे
जन्म : २३ ऑक्टोबर १९४५, वसई, भुईगाव येथे झाला.
धर्म शिक्षण : सेंट पायस कॉलेज, मुंबई आणि पेपल अॅथेनियम (विद्यापीठ), पुणे
गुरू दिक्षा : ३१ ऑक्टोबर १९७१, आर्च बिशप सायमन पिमेेंटा,
वसईतील पापडी येथील कृपामाता चर्चमध्ये देण्यात आली.
धर्मगुरु म्हणून नेमणूक -
धर्मगुरू म्हणून पहिली नेमणूक :
१ जून १९७२ ते जून १९७३
वांदे येथील सेंट अॅनीज चर्च मध्ये झाली.
प्राध्यापक म्हणून नेमणूक -
त्यानंतर जून १९७३ मध्ये पुणे येथील पेपल अॅथेनियममध्ये थिऑलॉजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
उच्च शिक्षण-
सप्टेंबर १९८२ ते डिसेंबर १९८३ थिऑलॉजीमध्ये उच्च शिक्षण अमेरिका आणि कॅनडात.
सेक्रेटरी म्हणून जबाबदारी-
१९९८ मध्ये भारतातील बिशप परिषदेचे सेक्रेटरी जनरल म्हणून जबाबदारी देण्यात आली.
वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून नेमणूक -
२२ मे १९९८ रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून पोप द्वितीय पॉल जॉन यांनी त्यांची नेमणूक केली.
त्यांची प्रकाशित पुस्तके-
१. 'गॉड एक्सपिरियन्स ऑफ संत तुकाराम : ए स्टडी इन रिलिजियस सिम्बॉलिझम' (डॉक्टरेट प्रबंध)
२. वसई धर्मप्रांत
३. संुदर ते ध्यान
४. मराठी लेखांचा संग्रह
५. असगर अली संपादित 'सुफीझम अँड कम्युनल हार्मनी' पुस्तकात 'मिस्टिसिझम इन महाराष्ट्र : द व्हिजन ऑफ नॉन कम्युनल सोसायटी' लेखाचा समावेश.
६. तुकारामांच्या अभंगातील 'संसार-माहेर'वरील लेख, यांसह विपुल लेखन
प्रबंध-
१. जेरुसलेम : रिलिजियस लीडरशिप इन मल्टिकल्चरल सोसायटी
(१ फेब्रु. १९९४)
२. मॉस्कोत तुकारामांविषयी (१९९५)
३. मुंबईत सोमय्या विद्यापीठात आयोजित 'आंतरधमीर्य सुसंवाद' विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य भाषण (५ ऑक्टोबर १९९७)
४. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिषदेत डिसेंबर १९९७मध्ये 'ख्रिश्चॅनिटी अँड सुफी सेक्ट'वर प्रबंध सादर. यांसह अनेक प्रकारचे प्रबंध प्रसिद्ध
पुण्यातील सेंट बिशप पेंट्रोक महाविद्यालयात त्यांचा 24 ऑक्टोबर रोजी
डॉ मॅन्युएल डिसोझा, यांच्या प्रयत्नातून नाना पटोले यांना विनंती करून त्यांनी हा कार्यक्रम घडवुन आणला.
झालेल्या या कार्यक्रमात ख्रिस्ती धर्म गुरू बिशप यांचा पुष्पगुच्छ देऊन नाना पटोले, मोहन जोशी, डॉ मॅन्युएल डिसोझा, उल्हास दादा यांनी सत्कार करून वाढ दिवस साजरा केला.
यावेळी नाना पटोले यांचा डॉ मॅन्युएल डिसोझा यांनी शाल श्रीफल पुष्पगुच्छ, देवुन व शाल पांगरून सत्कार करण्यात आला.
धर्मगुरु बिशप डॉ थॉमस मॅन्युएल डाबरे -
यावेळी ख्रिच्चन धर्मगुरु बिशप यांनी काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले
त्यात सर्व धर्माची लोकं होती.
अशा या काँग्रेस पक्षाला 120 वर्षाचा इतिहास आहे. आणि ते सर्वधर्माला सोबत सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.
असे सांगून मानव कल्याण आणि देश हितासाठी सांततेच्या मार्गाची गरज
आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले,
कांही शक्ति देशाच्या हिताच्या नाहीत. पण त्या प्रबळ होताना दिसत आहेत. असा सूचक इशारा देऊन राजकीय पक्षाच्या लोकांनी मानव कल्याना साठी प्राधान्य दिले पाहिजे.असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले-
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष नेहमी सर्व जाती धर्माच्या सोबत असून मिशनरी च्या पाठीशी खम्बीर पणे उभा राहील असे आश्वासन देऊन देशात इंदीरा जींनी आणलेली आणीबाणी ही त्यावेळेची गरज होती हे स्पष्ट केले.
कोणताही अतिरेक हा चुकीचा असून अत्याचार करणारा शिशुपाल व श्रीकृष्ण यांचा दृठांत सांगून कोणत्याहि गोष्टीचा अंत ठरलेला आहे असे स्पष्ट करून व अनेक विषयावर त्यांनी मतं मांडली.
माजी आमदार मोहन दादा जोशी, उल्हास दादा यांनी ही मनोगत व्यक्त करून शुभेच्या दिल्या.
या वेळी प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले, माजी आमदार मोहन दादा जोशी, उल्लास दादा, आयोजक- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व ऑल इंडिया ख्रिश्चन काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मॅन्युएल डिसोझा, जैक्लीन फॉरेस्टर, रेफेन्स अलफोंस, नगरसेवक अविनाश बागवे, श्रीमती संगीताताई तिवारी, सिरिल भाई, ग्लेडिस डाइस, डॉ जेनेट जोसेफ व कांही मान्यवर उपस्थित होते.