कोंढवा येथे राष्ट्रवादी चे संघटक सचिव हेमंत काका बधे यांच्या वाढदिवसा निमित्य 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

कोंढवा येथे हेमंत काका बधे यांच्या वाढदिवसा निमित्य 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून माणुसकी जपत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव हेमंत काका बधे हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असतात.
ते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असून त्यांचा वाढदिवस दि.10 ऑक्टोबर रोजी 
खडी मशीन चौकात हेमंत सम्पर्क कार्यालयात रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला.

या शिबिराचे उदघाटन माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते सम्पन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष आबा तुपे,कार्याध्यक्ष संदीप नाना बधे, व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदात्यांना पाच लाखाचा अपघाती विमा व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हेमंत बधे यांच्या नेतृत्वात व महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते यावेळी येथिल उद्योगपती
यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रवेश केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post