बहुजन हिताय ट्रष्ट लातूर शाखा च्या वतीने लातुरात गरजु कुटूंबना धान्य किट चे वाटप


लातूर शहरात बहुजन हिताय बहुजन सुखाय ट्रष्ट च्या वतीने गरजु कुटुंबातील नागरिकांना बहूजन हिताय ट्रस्ट, पुणे-संचलित बहुजन हिताय शाखा लातूर च्या माध्यमातून नवाला साजेसा सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत, 30 गरजू कुटुंबाना धान्य किट वाटप करून जपली सामाजिक बांधीलकी

कोरोनाच्या महामारीने अनेकांच्या घरातील
जिवाभावाची आणि कमावती माणसं दुरावली गेली.काहींचा मायेचा आधार गेला, अनेकांच्या हाताचे काम गेली तर कांहींच्या घरातील कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर सर्व बाजूनी दुःखाचा डोंगर कोसळला अशा कुटूंबना मदत म्हणून दि.26 ते 29 ऑक्टोबर 2021 या चार दिवसात लातूर येथील कैलास नगर, पेठ, शिवाजी नगर, इंदिरा नगर, विलास नगर, प्रकाशनगर, विकासनगर, न्यूभाग्य नगर, आनंद नगर, चिंचोलीराव वाडी, दांडगी चपोली या भागातील कुटुंबातील धान्य किट वाटप करण्यात आले.


कोरोना बाधीत कुटुंब , कॅन्सरच्या आजाराने त्रस्त, विधवा घरकाम करणाऱ्या महिला, अंध,अपंग व्यक्ती, कचरा उचलणारे, कामगार, घणंटागाडीवाले, वयोवृद्ध निराधार, गरीब अशा गरजू 30 कुटूंबाला अन्नधान्य किटचे वाटप वसतिगृहाचे माझी चेअरमन मा.अशोकराव कांबळे, गोपीनाथ कांबळे, नागेश जोगदंड सूर्यवंशी, श्रीधर व कल्याणदस्सी यांच्या हस्ते करण्यात आले.🙏🏻
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post