पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही . - शरद पवार

पुणे शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे हद्दवाढीचा प्रश्न घेऊन पुन्हा पुढे ढकलणे योग्य नाही.
परंतु यासंबंधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवा. यावर राज्य सरकार योग्य रीतीने पाऊल टाकेल, असा मला विश्वास  असल्याचे राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.
त्यांच् प्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लतेच्या पार्वभूमिवर अपन यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे ही सांगितले.


आज त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधून सहकार क्षेत्राविषयी सुद्धा मते व्यक्त केली. 
सहकार कायद्यासंबंधी बोलताना ते म्हणाले,  ९७ वी घटनादुरुस्ती २०११ मध्ये मी केवळ एक मंत्री म्हणून मांडली नाही तर देशातील सहकार मंत्री म्हणून, बँकांचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून, कायद्यात बदल करण्याचा निर्णय त्यावेळी तत्कालीन सरकारने घेतला.
त्यानुसार राज्य सरकारांना सहकारी क्षेत्रात मदत करण्याचा अधिकार आहे. परंतु सत्तेतील पक्षाने सहकारी बँकांची चौकशी लावण्याबाबत, त्या बँकेत किती हस्तक्षेप करावा याबाबत सूत्र ठरविण्यात आले व सहकारी बँकांना संरक्षण देण्यात आले. दुर्दैवाने यात वेगळा विचार करण्याची चर्चा सुरु आहे.
मात्र यासंदर्भात अत्युच्च पदावर असलेल्या लोकांचा सहकारविषयक दृष्टीकोन आम्ही अनेक वर्ष पाहत आहोत. त्यांच्यापुढे हा विषय मांडून सहकारी बँकांना संकटातून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मागील काही वर्षांपासून ईडी ही नवीन यंत्रणा लोकांच्या परिचयात आली आहे. ही यंत्रणा कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. भावना गवळी यांनी माझी भेट घेतली.त्यांच्या संस्थांना ईडीचा त्रास होतोय. गैरव्यवहार झाले असल्यास आहेत त्याची तक्रार संबंधित विभागाच्या ठराविक संस्थांकडे करता येते.

मात्र असे असतानाही ईडी त्याठिकाणी संस्थांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने राज्याच्या अधिकारांवर एक प्रकारे गदा येत आहे. हस्तक्षेपाची अशी वाढती उदाहरणे हल्ली ऐकण्यात येत असून या गोष्टी मला योग्य वाटत नाहीत. त्यामुळे पुढील अधिवेशनात हा विषय एकत्रितपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.

अनेक वर्षात महाराष्ट्रात इतक्या जास्त प्रमाणात ईडीच्या केस कधी ऐकण्यात आल्या नव्हत्या. आता एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक नेत्यांविरोधी चौकशी सुरु आहे. ईडीचा एक साधन म्हणून वापर करून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पुणे शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे हद्दवाढीचा प्रश्न घेऊन पुन्हा पुढे ढकलणे योग्य नाही. परंतु यासंबंधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकार योग्य रीतीने पाऊल टाकेल, असा मला विश्वास आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम न करण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते योग्यच आहे. मीदेखील हजारोंच्या संख्येने गर्दी होईल अशा कार्यक्रमांना जाणार नाही व कोरोना संबंधी योग्य काळजी घेतली असेल अशाच कार्यक्रमांना उपस्थित राहीन.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post