चूल पेटवून सिलेंडर ची अंत्ययात्रा आणि पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निर्देशने

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील चौक येथे पेटवून सिलेंडर ची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले.
तसेच निष्क्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना "शेणाच्या गोवऱ्या" कुरिअर ने पाठवून देण्यात येणार आहे. काँग्रेसच्या काळात थोडी दरवाढ झाल्यानंतर त्वेषाने बोलणाऱ्या व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविणाऱ्या स्मृती इराणी यांना "चप्पलचे जोडे" कुरिअर ने पाठविले. असल्याचे सांगुण त्या चप्पल हुंगुन तरी स्मृती इराणी यांना झालेली विस्मृती परत येईल व त्या आपल्या सरकारला जाब विचारतील असे त्या म्हणाल्या.
या आंदोलनात राज्यमंत्री ना. विश्वजीतदादा कदम, पुणे शहर अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी, मा. अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष मा. आमिर शेख, मा. गोपाळ तिवारी, मा. संजय बालगुडे, मा. कमल व्यवहारे, युवक अध्यक्ष विशाल मलके, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष भूषण रणभरे, वीरेंद्र किराड, रफिक शेख, सेवा दल अध्यक्ष प्रकाश पवार, लताबाई राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, पूजा आनंद व पुणे शहरातील सर्व मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी श्री विश्वजित कदम साहेब म्हणाले, केंद्र सरकार ने प्रचंड महागाई करून सामान्य नागरिकांना या महागाईचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची खूप महागाई केली केंद्र सरकारने, त्याचे निषेध अख्या भारतभर केली जात आहे. जे पर्यंत दर कमी करत नाही आम्ही आंदोलन करत राहणार. आंदोलनाच्या माध्यमातून झोपी गेलेले सरकार जागे करू.
" देश की जनता की एकही पुकार.....
गद्दी छोडो मोदी सरकार .... "
आशा अनेक घोषनांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनात मा. रमेशदादा बागवे, मा. मोहन जोशी यांची भाषणे झाली. आभार शर्वरी गोटारणे यांनी मानले.तर महिला कार्यकर्त्या छाया जाधव, शर्वरी गोतावने, रजीया बल्लारी, शारदा वीर, ज्योती अरवेन, नलिनी दोरगे, कविता गायकवाड, ललिता जगताप, मोना गायकर, रसिका भगवाने, सीमा महाडिक, वैशाली रेड्डी, प्रियंका मधाले, मनीषा करपे, ताई कसबे, सुंदर ओव्हाळ, माया दुरे, कांचन बलनैक, अनुसया गायकवाड, हलिमा शेख, धुरी आपा, रोहिणी माल्लव, पापिता सोनवणे, सुनिता शेलार, वंदना सातपुते, अशा कल्गेंद्रे, सोनी ओव्हाळ, दुर्गा शुक्री, सुनिता हिवरकर, मीरा शिंदे, माया तुजारे, रसिका बागवने, कविता पटेदर, इत्यादी महिला उपस्थित होते.
आंदोलनाचे आयोजन मा. सोनाली मारणे (शहर महिला काँग्रेस अध्यक्ष, पुणे) यांनी केले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post