कोंढवा-येवलेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शासन आपल्या दारी उपक्रम घेवुन वाढदिवस साजरा करण्यात आला

या कार्यक्रमाचे उदघाटन हडपसर विधानसभा आमदार चेतन तुपे यांनी केले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा रा.काँ.पा.अध्यक्ष पुणे शहर प्रशांत दादा जगताप, संध्याताई सोनवणे ह. वि. म.संघ महिला अध्यक्ष पूनम ताई पाटील, प्रभाग क्रमांक 41 सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि.22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवस नागरिकांना विविध सामाजिक सेवा पुरवुन साजरा करण्यात आला.सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत नागरिकांना विविध प्रमाणपत्र, शासकीय योजना, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड नोंदणी, व इंडियन पोष्ट खाते पासबुक इत्यादी मोफत सेवा पुरविण्यात आल्या.

दिकसभर पाऊस असून सुद्धा या भागांतील अनेक नागरिकांनी आपल्या मुलांचे आधार नोंदणी, पोष्ट पास बुक, जेष्ठ योजनांची माहिती, आणि आधार लिंक करण्यासाठी पावसात ही गर्दी केली होती.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने