पुणे- कोंढवा येथील मा.असिफ शेख यांनी आपला वाढदिवस हा वायफळ विनाकारण दिखाव्यासाठी न खर्च न करता एक सामाजिक जबाबदारी स्वीकारत माणुसकीच्या दृष्टिकोनातून येथील पिताश्री आश्रमात जाऊन तेथील सर्व जेष्ठ नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या हाताने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमात हडपसर विधानसभा काँग्रेस महिला अध्यक्ष सौ.मायाताई डुरे,शहर चिटणीस अकबर शेख, हडपसर विधानसभा सरचिटणीस देवदास लोणकर, प्रभाग अध्यक्ष नूर भाई शेख यांच्या हस्ते आश्रमातील सर्व वृद्धांना ब्लेंकेट व बेडशीट चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विधानसभा काँग्रेस सरचिटणीस देवदास लोणकर यांच्या हस्ते उपस्थितींचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन पत्रकार मल्लीनाथ गुरवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाग अध्यक्ष नूर भाई शेख यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी व प्रभाग अध्यक्ष मा.नुर भाई शेख यांनी केले होते