पेट्रोल डिझेल व गॅस चे वाढवलेले दर हा केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या खिशावर घातलेला शासकीय दरोडा आहे : प्रा.शोहेब इनामदार

पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्द्यतेलाच्या किमतीत केंद्र सरकारने भरमसाट वाढ केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी हडपसर विधानसभा कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रा. शोहेब इनामदार यांनी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर महागाईच्या रूपाने घातलेला हा शासकीय दरोडा असल्याचे सांगून,
पुढे बोलताना ते म्हणाले,"सात वर्षांपूर्वी या देशांमध्ये अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली.
सत्तेच्या लालसेपोटी आता जनतेलाच खोटे ठरवून हुकुमशाही नेतृत्वाने करोना च्या महामारीमध्ये आर्थिक कंबरडे मोडलेले असताना पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ केली असळताने भारतीय जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्मान झालेला आहे.
या दरवाढीचा आम्ही निषेध करतो. आणि भविष्यात दरवाढ कमी केली नाही तर काँग्रेस पक्ष जनतेला घेऊन रस्त्यावर उतरु असा इशारा ही यांनी यावेळी दिला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा शफी इनामदार, पल्लवी ताई सुरसे, प्रशांत सुरसे,खंडू लोंढे, उपाध्यक्ष रमेश राऊत, नदीम मुजावर, देवदास लोणकर,युवक अध्यक्ष अमित घुले, शाम ससाणे सर, डॉ. अबोली इनामदार, रोहित साळवे, नुरुल्ला शेख, राजा शिंदे, शहाजी खंडागळे, सोहेल लांडगे, मीनाक्षी शिंदे, अभिनव परदेशी, एजाज सय्यद, बाळासाहेब टिळेकर, सोहेल लांडगे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने