खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त कोंढवा खुर्द, पुणे येथे मोफत डोळे (नेत्र) तपासणी शिबीर घेण्यात आले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते, खासदार मा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे मोफत डोळे (नेत्र) तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.

या शिबीराचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.गृह राजमंत्री रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते झाले.
या शिबीरात 106 नागरिकांनी लाभ घेतला. त्यातील 6 रुग्णाची मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मा. साहीलजी केदारी, हडपसर ब्लाँक काँग्रेस अध्यक्ष प्रो. शोहेब ईनामदार, जेष्ठ नेते मा. दत्तात्रेय डुरे, पुणे शहर काँग्रेस अपंग सेल अध्यक्ष मा. निम्हण साहेब, पुणे शहर सरचिटणीस केविन म्यानुअल, पुणे शहर महिला काँग्रेस सचिव कांचन बालनायक, पुणे शहर अनु.जाती विभाग उपाध्यक्षा रिबेका कांबळे, आँल इंडिया काँग्रेस वर्कर कमिटी अल्पसंख्यक अध्यक्ष जाँसेफ पाँल, हडपसर कामगार सेलचे अध्यक्ष मा. गजानन भोसले, अपंग सेलचे सविता मिटकरी, चद्रकांत डोगडे, जाकिर नदाफ तसेच हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबीराचे आयोजन मा. देवदास द. लोणकर यांनी केले होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post

Popular Items