घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन कॉंग्रेस भवन येथे करण्यात आले होते.
यावेळी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम, शहराध्यक्ष मा. रमेश बागवे , माजी मंत्री मा. बाळासाहेब शिवरकर , मा. अभय छाजेड, मा. कमल व्यवहारे , मा. संजय बालगुडे, नगरसेवक मा. अरविंद शिंदे, मा. अविनाश बागवे, मा. आमिर शेख, विशाल मलके , भूषण रानभरे, शिलार रतनगीरी , रमेश अय्यर, चैतन्य पुरंदरे, मिलिंद गवंडी आदी उपस्थित होते.
यावेळी रेडीमेसीवर इंजेक्शनच्या जाणवणारया तुटवड्याबाबत शहराध्यक्ष मा रमेश बागवे व अरविंद शिंदे यांनी राज्यमंत्री मा. विश्वजित कदम यांना माहिती देण्यात आली.
त्यांनी तात्काळ आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. अमित देशमुख, पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पुणे शहरातील रेडीमेसीवर इंजेक्शनबाबत योग्य ती व्यवस्था करावी अशी विनंती केली.
सदर शिबिराला रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड व के.ई.एम. हॉस्पिटल रक्तपेढीचे किशोर धुमाळ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सुमारे 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.