पर्वानाधारक रिक्षा व्यवसायिकांसाठी १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान,पासबुक वर जमा होणार प्रत्येकी १५०० रुपये

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात अनेक प्रकारचे कडक निर्बंध घालण्यात आले. दैनंदिन रिक्षा भाडेवर उपजिविका असणारे रिक्षा व्यावसाय बंद झाल्याने ते अर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्यात एकूण सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक आहेत. त्यांच्या मार्फत रिक्षा व्यावसायातुन शासनाला प्रतिवर्षी करापोटी महसूल मिळत असतो.
वर्षाला एकठरविक महसूल मिळवून देणारा घटक असल्याने संकट काळात शासनाने त्यांना अर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षा व्यवसायिक संघटनेकडून करण्यात आली होती.

त्यानुसार परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात या संदर्भात संयुक्त बैठक झाली.

राज्ययील सर्व पर्वानाधारकाना एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात  असल्याचे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.
त्यामुळे प्रत्येकी परवानाधारकास १५०० रुपये सानुग्रह म्हणुन दिले जाणार आहे.
ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे.
परवानाधारक रिक्षा चालकांच्या आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
या प्रणालीची माहिती परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post