कोंढवा येथील प्राईम रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

कोंढवा : येथील प्राईम रुग्णालयात आलेल्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर तो मृत झाल्याचे सांगताच चिडलेल्या नातेवाईकांची डॉक्टराना मारहाण व रुग्णालयाची तोडफोड केल्याची तक्रार कोंढवा पोलिसात करण्यात आली असून नातेवाईक जमावावर गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथिल प्राईम हॉस्पिटल मध्ये ही घटना दि.२० मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
कार्डीयाक रुग्णवाहिका एक रुग्ण घेऊन आली होती. डॉ. सिद्धांत तोतला यांनी या रुग्णांची तपासणी केली. पण, त्याची नाडी लागत नसल्याने त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले. वरिष्ठ डॉ. ताबिश आणि डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली असता तो मयात असल्याचे सांगताच
त्या ठिकाणी जमलेल्या नातेवाईक जमावाने डॉक्टरांहलर हल्ला केला. तसेच हॉस्पिटलच्या समोरील दरवाजावर दगडफेक करत तोडफोड केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
डॉ.सिद्धांत उदयकुमार तोटला वय २५ यांनी तक्रार दिली आहे.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post

Popular Items