कोंढवा दि.१५ जाने- भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघ व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र 41 कोंढवा-येवलेवाडी ची कार्यकारणी निवड करण्यात आली.
१५ जानेवारी रोजी साळवे गार्डन कोंढवा बु.येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर व मा.जगदीश मुळीक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी नवीन निवड झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वितरण भाजपा पुणे शहराध्यक्ष मा.श्री.मा.जगदीशभाऊ मुळीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्री.प्रमोद बापू टिळेकर यांची भाजपा प्रभाग क्र.41 कोंढवा बुद्रुक च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हडपसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी अमर गव्हाणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित हडपसर विधानसभा अध्यक्ष श्री.संदीप दळवी,गणेशजी घोष, नगरसेविका रंजनताई टिळेकर, वृषाली ताई कामठे, उज्वला ताई जंगले, नगरसेवक विरसेन जगताप, अनिल येवले, सतिष मारकड, तुषार कदम, संदीप लोणकर, भूषण तुपे, शिवराज आप्पा घुले, विजया ताई वाडकर, अनुराधा नखाते, संदीप शेंडगे, आकाश डांगमाळी, प्रमोद सातव, नितीन होले, संदीप ओव्हाळ, संतोष शिंदे, निखिल पंचंभाई, भास्कर राऊत, संभाजी कामठे, गणेश घुले, वंदनाताई कोद्रे, प्रमोद टिळेकर, दीपक पालवे, डॉ. दादा कोद्रे, शैलेंद्र बेल्हेकर.



