सासवड दि, 3 जाने- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सासवड येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आदरांजली कार्यक्रमात घेण्यात आला.
स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या,अंनत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या,पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी सासवड येथील पुरंदर हयस्कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, प्राचार्य हनीफ मुजावर, संदीप किरवे, बी.ई.घुले, विलास कसबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.