पुण्यात सावित्रीबाई फुले स्मारकासमोर जन आंदोलन संघर्ष समिती कार्यकर्त्यांनी संघर्ष तीव्र करण्याची घेतली शपथ

पुणे दि.०१, जाने-   
पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारका समोर जन अंदोलन संघर्ष समिती तर्फे किसान, मजदुर व इतर असंविधानीक कायद्याच्या विरोधात जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत  संघर्ष करण्याची शपथ घेतली.

छायाचित्र- काँम्रेड अरविंद जक्का,काँ, लताताई भिसे,सुभाष वारे,असलम  बागवान,अँड,संतोष म्हस्के,पत्रकार मल्लीनाथ गुरवे,दत्ता पाखिरे, इब्राहिम खान,विनाताई कदम,राजूसय्यद, साहिल मणियार, शानु पठाण </div>

देशातील मजुर व असंघटित कामगारांना योग्य न्याय मिळावा, शेतकरी हिता विरोधी शासकीय कायदे त्वरित मागे घेण्यात यावे, दिल्ली येथे सुरू असलेले किसन आंदोलन  यासाठी पुण्यात विविध संघटनांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी संघर्ष समिती निर्माण केली गेली आहे. 
दि.१ जानेवारी रोजी नवीन वर्षा दिनी पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारका समोर कार्यकर्त्यांनी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रीकाचे वाचन करून सर्वानी राज्यघटनेच्या सौरक्षणाची शपथ घेतली.
जन अंदोलन संघर्ष समिती तर्फे किसान, मजदुर व इतर असंविधानीक कायद्याच्या विरोधात जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत लढत राहू असा ठाम निर्धार करीत सर्व संघनानी एकत्रीत येऊन संघर्ष आणखीन तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. 
किसान आणि मजदुर व इतर असंविधानीक कायद्याच्या विरोधात जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत सर्व संघटना एकत्रीत येऊन संघर्ष करण्याची शपथ घेतली. 
पुणे आणि जिल्यातील विविध भागात विविध ठिकाणी जनजागृती,पोष्टर वाटप सह रस्ता रोको करण्याचा मनोदय आणि नियोजन करणे यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी काँम्रेड अरविंद जक्का, काँ, लताताई भिसे, सुभाषजी वारे, असलम इसाक बागवान, अँड, संतोष म्हस्के, पत्रकार मल्लीनाथ गुरवे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाखिरे, इब्राहिम खान, विनाताई कदम, राजू सय्यद, साहिल मणियार, शानु पठाण व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने