पुणे दि,22 जाने-
आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती,जन आंदोलनची संघर्ष समिती, एन ए पी एम इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच यांच्या माध्यमातून किसानबाग सायकल रँलीस पुण्याच्या सारसबाग येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथुन मुंबईच्या दिशेने रवाना झाकी.
ही रॅली सचिन विनायक अल्लाट यांच्या नेत्रत्वात काढण्यात आली आहे. पुणे स्वारगेट सारस बाग सावित्रीबाई फुले स्मारक समोर सकाळी 9.30 वाजता विरांचा जागर, मार्गदर्शन शेतकरी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी, क्रांतीकारी गाणे, सादर करून आंदोलनाची पार्श्वभुमी समजावुन सायकल रॅलीला सुरवात झाली.
या वेळी अहिल्याबाई होळकर, शाहिर अण्णाभाऊ साठे, एस एम जोशी, छत्रपती शिवाजी महाराज, कामगार पुतळा, दापोडी येथील शहिद भगतसिंग, पिंपरी येथील आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत थेट रॅली बाजीराव रोड मार्गे दापोडी,पिमरी चिंचवड लोणावळा मार्गे रवाना झाली.
रँलीचे स्वागत बाजिराव रोड, शिवाजीनगर न्यायालयातील वकिल संघटना, पाटील इस्टेट येथे कामगार अन्याय प्रतिकार समती ,बोपोडी, तसेच पिंपरी, येथे स्वराज अभियान चे मानव कांबळे, मारुती भापकर, धोत्रे यांनी तर आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महा संघ तर्फे अध्यक्ष अंबर चिंचवडे उपाध्यक्ष बाळासाहेब कापसे तसेच काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सेवा दल अध्यक्ष मकरध्वज यादव, मयुर जयस्वाल इतर कार्यकर्ते यांनी स्वागत केलें.