पुणे/कोंढवा,दि,21 जाने-
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत हडपसर कॉंग्रेस च्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवस निम्मित कोंढवा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मा वाटप कार्यकम घेण्यात आला.
गुरुवार दि. २१ जाने रोजी कोंढवा खुर्द मधील भैरवनाथ आळी येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक मा श्री अविनाशजी बागवे व मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष मा श्री सचिनभाऊ आडेकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष मा.प्रा.सोहेब इनामदार, महिला अध्यक्ष सौ.माया डुरे, व लायन्स क्लब पुना अध्यक्ष संतोष पाटवा उपस्थीत होते.
त्याचप्रमाणे पुणे शहर सरचिटनीस अकबर शेख, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष शब्बीर कपासी,पत्रकार मल्लिनाथ गुरवे, पुणे शहर महिला सचिव सौ.कांचन बालनायक, सेवा दलाच्या विना कदम, हडपसर विधानसभा अनु.जाती विभाग अध्यक्ष सौ.रिबेका कांबळे, उपाध्यक्षा ग्लाँडस डायस, अपंग सेल अध्यक्ष सौ.मीनाक्षी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मा.संजय डुरे, मा.जाकिर नदाफ, ईनामदार,जेष्ठ नेते जोसेफ पाँल व इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा सरचिटणीस मा श्री देवदास लोणकर व सौ.डुरे यांनी केले होते.