ड्रेनेजच्या गटारचं पाणी रस्त्यावर आणि रस्त्यावरील घाण पाणी,मोटारसायकल चालकांच्या थेट अंगावर. कोंढव्यात ड्रेनेज दुरुस्ती वाल्यांचं चाल्लय काय? पालिका प्रशासन याकडे लक्ष देतील का?

पुणे- कोंढवा खुर्द बस स्टॅंड समोर मुख्य रस्त्यावर ड्रेनेज ओहरफ्लो होऊन ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. वाहते घाण पाणी  वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने पालिका प्रशासनाच्या कामावर संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे- कोंढवा खुर्द येथे आज दि.३ डिसेंबर रोजी मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी
  

पुणे- कोंढवा खुर्द येथे आज दि.३ डिसेंबर रोजी सकाळी मुख्य रस्त्यावर वाहणारे ड्रेनेजचे पाणी आणि वाहनाची वर्दळ

कोरोनाच्या महामारीतून आत्ता कुठेतरी बाहेर पडून पुणेकर आपापल्या कामाची विस्कटलेली घडी बसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ज्याला त्याला, प्रत्येकाला वेळेवर ऑफिसला कामावर जाणे अपेक्षित असते.
कोंढवा मेन बसस्टॉप समोसमोर ट्रॅफीक मधुन कसा तरी मार्ग काढत पुढे जावे लागते. 
त्यात रस्त्यावरच्या घाण पाण्याचे शिंतोडे अंगावर पडलेले पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली जात आहे.
आशीर्वाद बिल्डिंग समोर ड्रेनेज ओह्रफ्लो  झाले असून त्याचे पाणी मुख्य बसस्टँड,भैरवनाथ मंदिर,मीनाताई ठाकरे हौस्पिटल समोरून वाहत आहे.
अशोका म्युज, मुख्य बसस्टँड व भैरवनाथ मंदिर समोर अति महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी वारंवार ड्रेनेज ओहरफ्लो होत असल्याच्या वारंवार घटना घडत आहेत.
याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आसून,पालिका प्रशासनाला या संदर्भत माहिती देऊन ही अशा वारंवार घटना घटत आहेत.
त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन हा कायमचा पश्न सोडवावा अशी मागणी देवदास लोणकर, राहुल अप्पा लोणकर, सचिन कापरे, शंकर लोणकर यांनी केली आहे.
स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक ,निर्भीड , निरपेक्ष  वार्तांकन- बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items