MNK न्यूज स्क्रोल
आमदार चेतन तुपे, वारे,मूलनिवासी मुस्लिम मंच चे अंजुम इनामदार, निसार शेख, साबीर सय्यद व प्रा.सोहेब इनामदार
पुणे - हड़पसर भागातील सय्यदनगर येथे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शैक्षणिक संकुल यांच्या च्या वतीने कोरोना संदर्भात केलेल्या चांगल्या कामगिरी बद्दल कोव्हीड योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे यांनी आपल्या मार्गदर्शनत वरील मत व्यक्त केले.
व्यासपीठार ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे, मुफ्ती रईस साहब हे होते.
या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे व प्रमुख पाहुने यांच्या हस्ते मूलनिवासी मुस्लिम मंच चे अंजुम इनामदार, निसार शेख, साबीर सय्यद व त्यांचे सहकारी आणि इतर सफ़ाई कामगार यांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार व आयडियल चे कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले होते.
कार्यक्रमच्या शेवटी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कै.दत्तोबा ससाणे,अॅड. सुलतान इनामदार, पोलीस कर्मचारी दादा पोतदार यांना श्रद्धांजली वाहन्यात आली.
या कार्यक्रम साठी आयडीयल एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शफी इनामदार, पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेल चे साहिल केदारी, मुफ्ती नईम साहब, कांचन बालनायक, देवदास लोणकर, मसुद शेख उपस्थित होते.