पुण्यात किसान बाग सत्याग्रह
पुणे- केंद्र शासनाने शेतकरी आणि कामगारांच्या बदललेल्या कायद्या विरोधात पुणे येथे किसान बाग बेमुदत सत्याग्रह सुरु करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय समोर हे सत्याग्रह सुरु असून विविध संघटनांचा याला प्रतिसाद मिळत आहे.
दिल्ली शाहीनबाग यशस्वी लढाई च्या पार्श्वभूमीवर किसान बाग बेमुदत सत्यग्रह सुरू करण्यात आले आहे.
दररोज वेगळ्या वेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत. या बेमुदत सत्याग्रहाचा आजचा दि.१३ दिसेम्बर पाचवा दिवस आहे.
इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच, जन आंदोलन का राष्ट्रीय समन्वय, आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती. पुण्यातील शेकडो पुरोगामी संस्थांच्या माध्यमातून है सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.

पहिल्या सत्रात अँड म्हस्के, अँड शर्मा यांनी संविधान यावर मार्गदर्शन केले. भारतीय रिपब्लिकन फेडरेशन राष्ट्रीय महासचिव माऊली तथा ज्ञानदेव सोनवणे , फेडरेशन चे राज्य युवक अध्यक्ष विकास साळवे , जिल्हाध्यक्ष फिरोजभाई खान , पुणे जिल्हा महासचिव विरेन्द्र कोहलीं, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय वंजारे , पुणे शहराध्यक्ष अशिष जाधव , मावळ तालूका अध्यक्ष इंजिनिअर दिपक माने, यांच्या नेतृत्वात चर्चासत्र पार पडले.
या चर्चा सत्रात शेतकरी आत्महत्या का करतो ? मजुर कसा पिचला जातो ? यावर चर्चा घडवून आणण्यात आली.
तर तिसऱ्या सत्रात महिला मंडळ आयोजित, कथा, कविता, गाणी, वृक्षरोपन, शेतीतील कामाचे स्वरूप या वर प्रात्यक्षिके सादर केली गेली.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटना; भारतीय महिला फेडरेशन; कागद काच पत्र कष्टकरी पंचायत; समाजवादी महिला सभा, नारी समता मंच; महिला सर्वांगीणी उत्कर्ष मंडळ (मासूम); चेतना महिला विकास संस्था; सहेली संघ; स्त्रीवाणी; महिला किसान अधिकार मंच (मकाम); भारिप-बहुजन महिला आघाडी; मोलकरीण पंचायत; श्रमिक मुक्ती दल (लोकशाही) महाराष्ट्र; भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन; लोकशाही उत्सव समिती; स्त्री मुक्ती संघटना; तथापि; मुस्लिम महिला संविधान हक्क परिषद; पुणे जिल्हा घरकामगार संघटना; जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय; पुणे शहर मोलकरीण संघटना यांचा सहभाग होता.
दिनांक 13/12/2020 रोजी छात्रभारती, राष्ट्रीय सेवादल आखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांनी किसान बागेत येवून या आंदोलन कर्त्यना प्रोत्साहन दिले.