पुण्यातील कात्रज येथील नवले पुल येथे ट्रकचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात
झाला असून सात तर आठ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुण्यात वाहतूकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या नवले पुल येथे दि. 16 दिसेम्बर दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास कात्रज कडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या 10 टायर माल वाहतूक ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात झाला.
भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने 7 ते 8 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जिवित हानी झालेली नाही.
अपघतानंतर ट्रक डाईव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून क्लिनरला संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला आहे.
अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी धाव घेत भारती विद्यापीठ पोलिस, पुणे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील गाड्या हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.