पुणे- स्वतंत्र भारताची राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, बंधुभाव अबाधित कायम ठेवत सर्व घटकांना एक समान अधिकार आणि सर्व हित साधणारे भारतीय संविधान म्हणजे सर्व भारतीयांचे सुरक्षाकवच.
ते लिहण्यासाठी डॉ.आंबेडकरांना एकूण 2 वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते. आज रोजी त्याला ७१ वर्ष पूर्ण झाले.
आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १४ पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले. निष्पाप १६ नागरिकांचा मृत्यू बळी गेला. आणि ३०८ नागरिकांना अपंगत्व पत्करावे लागले. आशा ह्या भ्याड हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाले.
त्यानिमित्ताने हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दि.२६.११.२०२० रोजी कोंढवा खुर्द येथे संविधान दिन आणि शहीदांना श्रद्धांजली चा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
संविधान प्रस्ताविकेचे वाचन व प्रस्तावना वाटप करून शेवटी मुंबई दहशतवाद हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवान व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात अली.
यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस सौ.कांचन बालनायक, ह.वि.कामगार सेलचे अध्यक्ष श्री गजानन भोसले, अपंग सेलचे उपाध्यक्ष श्री विजय इंगळे, पुणे शहर कोओडिनेटर ग्लाँडस डायस, सामाजिक कार्यकर्ते जाकिर नदाफ, पत्रकार श्री मल्लिनाथ गुरवे तसेच हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस कमिटीचे सरचिटनीस मा.श्री देवदास द.लोणकर यानी केले होते