केवळ २०टक्के लोक संविधान विरोधी कारवाया करीत आहेत, त्यामुळे ८० टक्के लोकांनी संविधान प्रति लढा उभारला पाहिजे - समाजवादी, संविधान समीक्षक सुभाष वारे यांचे मत

पुणे-
देशात संविधान लागू होण्यापूर्वी २०% लोकांकडे अधिक अधिकार होते. ते उरलेल्या ८० % लोकांवर अधिकार गाजवायचे, परंतु स्वातंत्र्यां नंतर संविधानाने ८०% लोकांना तो अधिकार वाटून दिला त्यामुळे २० % लोक त्यांचे अधिकचे अधिकार कमी झाल्याने अस्वस्थ झाले असुन संविधान विरोधी कारवायांना खतपाणी घालत आहेत. संविधान बदलण्याचा कधी ओपन तर कधी छुपा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ८० % लोकांनी संविधानाने मिळालेल्या अधिकारासाठी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. असे मत सामाजवादी नेते सुभाष वारे यांनी हडपसर येथे संविधान दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
हडपसार भागातील, सय्यद नगर येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी "हम भारत के लोग,"इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुप च्या वतीने संविधान दिन सभा व वकील सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमात सुभाष वारे यांच्या हस्ते वकिलांचा सत्कार करून उपस्थितांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुभाष वारे पुढे म्हणाले,
"संविधानाने सर्वाना समान अधिकार दिला. श्रीमंत,गरीब,व्यापारी,शेतकरी-शेतमजूर समान रेषेत आणले. देशाचा राजा हा वंशांने नव्हें तर प्रत्येकाच्या समान मताच्या आधारे निवडण्याची प्रक्रिया संविधानाने दिली. त्यामुळे २०% लोक संविधान बदलण्याचा, त्यातील अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
असे सांगून श्री वारे यांनी त्यांच्या भाषणात संविधान पूर्वी आणि संविधान लागू झाल्यानंतर नागरिकांची परिस्थिती त्यांचे अधिकार, कर्तव्य, आशा विविध प्रकारे चर्चात्मक, मुद्देसूद बदल विषद केला.

ऍड. मस्के यांनी त्यांच्या मर्गदर्शनात 'भारतीय समाज हा विविध जाती पंथ, विविध बोली भाषा, आणि विविध चालीरीती असलेला देश असून ही केवळ संविधानाने एकसंघ टिकुन राहिला आहे.
 त्यामुळे संविधान टिकले पाहिजे. संविधानाच्या सन्मानार्थ प्रत्येकांनी "जय संविधान" म्हणून बोलते राहिले पाहिजे अशी भूमिका मांडली.
तर इब्राहीम खान यांनी देखील संविधानाबद्दल उत्कृष्ट प्रकारे माहिती सांगितली, ॲडव्होकेट वर्मा साहेब व जालिंदर वाघमारे यांनी संविधानाबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व सूत्रसंचालक प्रा.शोहेब ईनामदार यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान, सामाजिक परिस्थीती यावर परखड मत मांडत उत्कृष्ट सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची रंगत आणि महत्व अधोरेखित केले.
इन्क्रेडिबल ग्रुप चे कार्यकर्ते: राजू सय्यद,नासिर शेख,साहिल मणियार, शाईन सिंदगी, विना कदम शानू पठाण, निखिल जाधव, मेहबूब अहमद, जालिंदर वाघमारे, अकबर मेमन ,ललिता गायकवाड रहीमभाई, गौरे साहेब नहीम सय्यद व पत्रकार मल्लिनाथ गुरवे,पत्रकार रहीम सर, आयडल स्कूल स्टाफ व नागरिक उपस्थित होते.

इन्क्रीडीबल ग्रुप कार्याध्यक्ष सचिन भाऊ आल्हाट यांनी डिस्टनसिंग नुसार अति उत्तम रित्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करून संविधान दिन. प्रबोधनात्मक रित्या साजरा केल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items