भारतरत्न' इन्दिरा गांधी यांच्या १०३ व्या जन्मदिना निमित्याने कोंढवा खुर्द येथे काँग्रेस च्या वतीने गरीब कुटुंबाना प्रत्येकी ५ किलो प्रमाणे एकुण ५०० किलो साखर वाटप करण्यात आले.

बँकाचे राष्ट्रीयकरण,पोखरण अण्वस्त्र कार्यक्रम आणि भारत-पाकिस्तान युद्ध या बाबींमध्ये स्वतःच्या धाडसी नेतृत्वाने महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी ऑफ इंडिया 'भारतरत्न' इन्दिरा गांधी यांच्या जन्मदिना निमित्याने कोंढवा खुर्द येथे गरीब कुटुंबाना प्रत्येकी ५किलो याप्रमाणे एकुण ५०० किलो साखर वाटप करण्यात आले. 
येथील कोणार्क पुरम सोसायटी समोरील तेजस हॉल मध्ये घेण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमात गरीब कुटुंबाना  महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेल काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा.अशोक मोरे, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.साहील केदारी यांच्या शुभहस्ते साखर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

 पुणे शहर वाहतुक सेलचे अध्यक्ष मा.हर्षद बोराटे,महा.पर्यावरण सेलचे सरचिटनीस मा.अशोक काळभोळ, चिटणीस वैशाली परदेशी,पर्यावरण पुणे शहर अध्यक्ष मा.प्रमोद पंडीत, मिना भारद्वाज,मेघशाम धर्मावत,तुषार नांदगुडे, विमल नंबियार,कांचन बालनायक,रिबेका कांबळे, मनिषा शिंदे,संगिता चव्हाण, ग्लाँडस डायस,जाकिर नदाफ, मोहम्मद इलियास,विजय इंगळे, समिर ईनामदार, तसेच हडपसर विधानसभा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
हडपसर विधानसभा काँग्रेस च्या वतीने या कार्यक्रमाचे सहआयोजक प्रो.शोहेब ईनामदार अध्यक्ष,सौ.माया डुरे,महिला अध्यक्षा, मा.शब्बीर कपासी उपाध्यक्ष, मा.वैभव डांगमाळी युवा नेते, मा.देवदास द.लोणकर सरचिटनीस, हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस कमिटी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हडपसर विधानसभा काँग्रेस सरचिटनीस मा. देवदास द.लोणकर यांनी केले.ब
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने