मनसेच्या वतीने ॲड.रुपाली ताई पाटील-ठोंबरे यांनी पुणे पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरला


पुणे,११ नोव्हेंबर-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे पदवीधर मतदार संघासाठी रुपाली पाटील-ठोंबरे यांना संधी देण्यात आली असून त्यांनी बुधवारी दि.११ रोजी अपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने विधानभवन येथे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती.
रुपाली ताई पाटील ह्या मनसेच्या तोफ म्हणून ओळखल्या जातात. अनेक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात एका बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारुन तिच्या हस्ते रुपाली पाटील यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने