पुणे, दि.११ नोव्हेंबर-
पुणे पदवीधर मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.सोमनाथ जनार्दन साळुंखे यांनी दि.११,बुधवार रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी या पूर्वीच प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उमेदवारी ची घोषणा केलेली होती.
बहुजन वंचित आघाडीचे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारी वारसा असणाऱ्या चळवळीतील युवक कार्यकर्त्याला पाठबळ देण्याच्या दृष्टीने प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
त्यानुसार प्रा. साळुंखे यांनी आपला दि.११ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव, पुणे वडगाव विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष विवेक लोंढे.
पुणे शहर महासचिव महेश कांबळे, जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, ऍड. मनोज माने, पुणे शहर अध्यक्ष मुनावर कुरेशी,आप्पासाहेब क्षीरसागर.
सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड, सयाजीराव झुंजार, संजय माळी त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा व सोलापूर अशा जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रा. सोमनाथ साळुंखे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असुन अभियांत्रिकी महाविद्यालयात गेली १३ वर्षांपासून अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रात पदवीधर परिवर्तन विकास माध्यमातून अनेक नवीन संकल्पना,सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
पदवीधरांनी काम करण्याची संधी द्यावी -
प्रा. सोमनाथ साळुंखे.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असुन,"पदवीधरांची स्वतंत्र जनगणना व्हावी, जिल्हानिहाय बेरोजगार पदवीधरांसाठी रोजगार, खाजगी कंपन्या व इण्डस्ट्रीमध्ये प्लेसमेंट सुविधा, स्पर्धा परीक्षा माहितीसाठी जिल्हानिहाय केंद्र, शेतीपूरक जोडधंदे व्यवसाय निर्मितीसाठी पदवीधरांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी माझा प्रयत्न राहील.
तरी मतदार बंधू-भगिनींनी आपले प्रथम पसंतीचे मत देऊन मला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन प्राध्यापक साळुंखे यांनी केले आहे.