उस्ताद लहुजी साळवे आणि पंडित नेहरु यांच्या जयंती निमित्त हडपसर येथे मुलांना पुष्प आणि खाऊ वाटप, इन्क्रीडबल ग्रुपचे सचिन आल्हाट यांचा पुढाकार

इन्क्रीडीबल संस्थापक अस्लम बागवान, हडपसर अध्यक्ष सचिन आल्हाट पत्रकार मल्लिनाथ गुरवे,हडसर काँग्रेस अध्यक्ष सोहेब इनामदार,वंचितचे धिवर सर,फरहान शेख,इब्राहिम खान,
पुणे/हडपसर-
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त बाल दिन व आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्य इंक्रेडीबल सोशल ग्रुप च्या वतीने तरडे वस्ती हडपसर येथे मुलांना पुष्प आणि खाऊ वाटप करण्यात आले.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांना फुलं आणी मुल हे खुप आवडत होते. त्यामुळे यांचा जन्म दिन "बाल दिवस "म्हणुन साजरा केला जातो. तर उस्ताद लव्हुजी साळवी हे स्वातंत्र लढ्यातील आध्य क्रातीकारक व १८५७ च्या उठावात त्याची फार महत्त्वाची भूमिका होती. तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले याना संरक्षण देऊन सामाजिक चळवलीळा प्रोत्साहन देण्याचे महत्व पूर्ण काम उस्ताद साळवे यांनी केले होते.
आशा या दोन् महापुरुषांच्या जयंती निमित्य त्यांच्या कार्याची मुलाना व नागरिकांना ओळख आणि माहिती असावी म्हणुन येथील इन्क्रीडाबल सोशल ग्रुप च्या वतीने सचिन आल्हाट यांनी जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अस्लम इसाक बागवान, इनक्रेडिबल समाजसेवक गृपचे हडपसर अध्यक्ष सचिन अल्हाट, काँग्रेसचे हडपसर मतदार संघ चे अध्यक्ष शोहैब इनामदार, वंचित बहुजन आघाडी हडपसर अध्यक्ष धीवार,फरहान शेख व एन ए पी एम चे समन्वय इब्राहिम खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले. व आभार कबिर शेख यांनी मानले.
आयोजन व्यवस्था राजु सय्यद, महेबुब अंन्सारी, निखिल जाधव, शंभु जाधव, कुणाल जाधव ,अहमद पठाण, संग्राम डांबरगीते, सुदर्शन गायकवाड, महेबुब शेख, सुरेखाताई खंडारे गीताताई वाकोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास आरोही खरात अभिज्ञा जाधव राहुल गायकवाड, अमित पोळ, पियुष मेश्राम, रोहित भांगिरे, कुणाल घुले, कल्पेश कल्पेश अल्हाट, मोसिन शेख, ज्योती सोनकांबळे, निकिता गोगावले,तृप्ती फुले, हसन पठाण यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमास तरडेवस्तीतील नागरीक आणि बालचमु उपस्थित होते
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने