हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने सय्यदनगर येथे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त अभिवादन


हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने सय्यदनगर येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री तथा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी देवदास लोणकर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व सामाजिक कार्य यावर मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी हडपसर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार, सरचिटणीस देवदास लोणकर, उपाध्यक्ष रमेश राऊत, सौ. संगीता कारंडे, नासिर शेख, राजू शेख, शेरमोहम्मद खान, विजय इंगळे व नागरिक उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने