सर्वांना एक समान, अंधश्रद्धा मुक्त, डोळस आणि धर्मविरहित, शिक्षण मिळाले पाहिजे.- सुराणा यांचे मत

पुणे: पुण्यातील कोंढवा खुर्द येथे रविवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल मध्ये नविन शैक्षणिक धोरण व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम सम्पन्न झाला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक गृप व हम भारतके लोग यांनी केले होते.
समाजवादी जेष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते विविध पत्रकारांचा सत्कार सोहळा सम्पन्न झाला

प्रमुख पाहुणे म्हणुन थोर समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा, मा सुनिती सुराणा, मा. विलासजी किरोते, मा, राजेंद्र बहाळकर,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका खान मँडम युनूस शेख, मँन्युअल डिसिल्व्हा आदी उपस्थित होते.
समाजवादी जेष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांनी नवीन शैक्षणिक धोरण, यासंदर्भात अनेक आक्षेप नोंदवले, नविन शेतकरी कायदा, खुली बाजार पेठ धोरण हे छोट्या शेतकऱ्यांना कशा उपयोगाच्या नाहीत हे सांगितले. "छोटा शेतकरी इछा असून देखील आपला माल हा इतर राज्यात किंवा परदेशात पाठवू शकत नाही, कारण त्यांचा मालच कमी प्रमाणात असल्याने वाहतूक खर्च परवडणार नाही. त्यामुळे त्यांना जवळच्याच बाजारपेठे माल विकणे हिताचे असते. त्यामुळे हे धोरणं शेतकरी हिताचे नसून व्यापार धार्जिणे असल्याचा आरोप केला.
त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात:
त्या त्या राज्यात मुलांना शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच मिळाले पाहिजे. शिक्षणाचे बाजारीकरण व घोटाळेबाज शिक्षण होता कामा नये. सर्वांना एक समान शिक्षण असले पाहिजे. गरीब श्रीमंत भेद करणारे शिक्षण असता कामा नये. प्राथमिक आणि मद्यमिक शिक्षण राज्य सरकारच्याच अधिपत्याखाली असायला हवे. प्राथमिक उच्च शिक्षण धोरणं कसे असावे यावर सविस्तर मत मांडले.
समाजवादी कार्यकर्त्या सुनीती सुराणा-
यांनी आपल्या मर्गदर्शनात-
महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या शिक्षणाच्या व्याख्याचा संदर्भ देत मन, शिक्षण हे मनगट, आणि मेंदूचा विकास करणारे हवे व हा देश सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे. त्यामूळे शिक्षणात कोणत्याही एका धर्माची सक्ती असता काम नये. त्या धर्माचा अतिरेक होता कामा नये असे घटनेचा दाखला देत मत मांडले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याचे स्वागत समाजसेवक इब्राहिम खान यांनी शाल व श्रीफळ देऊन केले. व सुत्रसंचलन मोहनिश सुपेकर यांनी तर आभार असलम इसाक बागवान यांनी केले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने