पुण्यातील कोंढवा बु, साईनगर च्या सम्राट अशोक बुद्ध विहारात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

             धम्म चक्र प्रवर्तन दिन. 
             अशोका विजया दशमी.
धम्म म्हणजे बौध्द जीवन मार्ग व चक्र म्हणजे त्या कार्याची योजना. तर प्रवर्तन म्हणजे गतिमान करणे. अर्थात धम्माच्या कार्याला गतिमान करण्याचा संकल्प दिन.
धम्मचक्र परिवर्तन दिनाचे बुद्ध धम्मात फार मोठे महत्व आहे.धम्म देश विदेशात हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
येथील त्रिरत्न सोशल फौंडेशन व भिम गर्जना तरुण मंडळ यांच्या वतीने रविवार दि. २५ ऑक्टबर रोजी सम्राट अशोक बुद्ध विहारात अशोका विजया दशमी व ६४ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व मोजक्या उपसकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
विजया दशमी रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात आयु.उपासक अप्पा तळेकर, महादेव झेंडे, शिवाजी झेंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात  आले.
तर आयु. वसंत करमनकर यांनी उपस्थितांच्या समवेत बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आदी बुद्ध धम्म विधी पठण करून कार्यक्रम पार पडला.
यावेळी अरुण शिंदे, सागर कांबळे, मल्लिनाथ गुरवे, महादेव झेंडे, शिवाजी झेंडे, अप्पा पालखे, दत्ता हजारे, राजू जाधव इत्यादी उपस्थित होते.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने