पुनेकरांसाठी स्वस्त आणि आरामदायक प्रवासासाठी आनंदाची बातमी

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक ,निर्भीड , निरपेक्ष वार्तांकन- बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११
पुणे दि.२४-
पुणेकरांना प्रवासासाठी आनंदाची बातमी असून पुण्यातील ४६ मार्गावर ३५० मिडीबस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
अशी माहिती पुणे केंटोमेन्ट आमदार सुनील कांबळे यांनी ट्विट करून दिली आहे.
PMPML ने 'अटल' योजना सुरू केली असून आज शनिवारी दि.२४ पासून ती सुरु होत आहेत.
पुण्यात मुंबई प्रमाणे लोकल रेल्वे जाळे नसल्याने पुणेकरांना प्रवासासाठी नोकरी असो की,काम-धंदा व्यवसाय करिता PMPML च्या बसेसवर अवलंबून राहवे लागते.
त्यामुळे प्रवासाच्या सोयीसाठी pmpml सातत्यानं नवनवीन बसेस व योजना राबवून पुणेकरांच्या प्रवासाची सोय करण्याचा प्रयत्न करीत असते.
तरीही संख्येच्या प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्याने पुणेकरांना प्रवासाची गैरसोय होत असते.
त्यामुळे दसरा दिवाळीच्या काळात प्रवासाच्या सोईसाठी एक नवी "अटल योजना" राबवून पुणेकरांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करीत आहे.३५० मिडीबस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आज पासून पुणेकरांना अल्प कमी दरात अवघ्या ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास करता येणार आहे.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने