कोंढवा येवलेवाडी दि.२१-
स्वर्गीय विलास भाऊ कामठे यांच्या वाढदिवसा निमत्त येवलेवाडी येथील मिनु मेहता हॉस्पिटल येथे (दि.२०) फळे वाटप करण्यात आले.
मनपाचे गटनेते वसंत तात्या मोरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले वाहण्यात अली. व फळे वाटुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अनेक कार्यकर्ते मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.
स्व.विलास कामठे हे कोंढवा येवलेवाडी प्रभागातील मनमिळाऊ स्वभाव, जीवाला जिव लावणारा, संकट काळात अहोरात्र खंबीर सोबत साथ देणारा, जिव्हाळ्याचा सुमुधुर खळखळणारा असा तो झरा, आज देहरुपणे सोबत नसला तरी त्यांच्या सोबतच्या समग्र आठवणीं मात्र आज ही कायम आहेत.
आज सोशल मीडियावर आठवण आणि प्रेरणा व्यक्त करणाऱ्या अनेक भावुक पोष्ट मित्र परिवारांनी टाकुन त्यांच्या प्रति आदर, प्रेम, आठवण आणि प्रेरणा अभिव्यक्त केल्या.
वाढ दिवसा निमित्य सोशल मीडियावर लिहितात, "भाऊ आज तुमचा वाढदिवस, तुमचा वाढदिवस म्हणजे आम्हा सगळ्यासाठी एक खास आनंदी दिवस होता. पण...
"भाऊ तुमच्या अकाली जाण्याने मात्र आम्हां समोर दुःखद प्रसंग ओढावला. पण भाऊ, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन आणि प्रेरणा हा आदर्श आम्ही सर्व कार्यकर्ते डोळ्यासमोर ठेऊन काम करतो आहोत.
भाऊ असा एकही दिवस नाही, तुमची आठवण आल्याशिवाय जात नाही. आज कोणतेही काम असो ताठ मानेने बोलतो भाऊंचा चा कार्यकर्ता आहे. जी ताकद ह्या नावात आहे ती कोणत्याही नाही."
भाऊ तुम्ही असताना अनेक गरीब लोकांना मदत केली. तुमची ही शिकवण आम्ही कार्यकते या पुढे ही न खचता अशीच मदत करत राहू. खर तर आजचा दिवस आम्हला खूप महत्वचा प्रेरणा देणारा आहे.
रोजचा दिवस भाऊंची आठवण आल्याशिवाय जात नाही.
मिस यु भाऊ!!