कोंढवा(पुणे)दि.२०-
कोंढवा येथे सांडपाणी वहिण्या देखभालीची योग्य निगराणी होत नसल्याने भागात वारंवार ओह्रफ्लो होण्याच्या घटना घडत आहेत.
गेल्या कांही दिवसापासून समोर कोंढवा मुख्य रस्त्यावर (बसथांब्या) गेले दोन दिवस दुर्घन्धी युक्त,घान पाणी वाहत आहे.
रस्त्यावर वाहणारे दुर्घन्धी युक्त,मल मिश्रित घान पाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे मोटार सायकल चालकांच्या व प्रवाशांच्या अंगावर शिंतोडे उडुत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
जवळच बसथांबा व मजुर अड्डा असल्याने तिथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. ज्याठिकाणी मलवाहीनी फुटली तेथेच काही दिवसांन पुर्वी पिण्याचे पाण्याचे जोड वाहीनी घेण्यात आली आहे.
मनपा प्रशासन यांनी लवकरात लवकर कारवाई करावी.अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देवदास दत्तात्रेय लोणकर सरचिटनीस हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस कमिटी यांनी दिला आहे.