कोंढवा खुर्द दि,15- कोंढवा भागातील शितल पंटोल पंप मागील सं नं ४९/१+४०/५ मधील अॕमिनिटी स्पेस जागावर भांजी मंडई व फळ बाजार उभारण्यासाठी मागणी (दि.१५ ऑक्टोबर) पुणे मनपा आयुक्ताना येथील नगरसेविका हमिदा अनिस सुंडके व नगरसेविका परविन हाजी फिरोज शेख यांनी निवेदन देऊन केली आहे.
अनेक वर्षापासुन कोंढवा मिठानगर भागातील हातगाडी व भाजीपाला विक्री मुख्य रस्त्यावर केला जातो. त्यामुळे या भागातील नागरिकांना व मोटार सायकल आणि व्हॅन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
कोंढाव्यातील पूर्वीची लोकसंख्या व वाहतूक संख्या मर्यादित असल्याने म्हणावा तितका त्रास जाणवत नव्हता परंतु आता वाहतूक व रहिवाशी नागरिक संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रस्ता ओलांडणे सुद्धा धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षो पासून स्वतंत्र जागेची मागणी असताना राजकर्त्यांनी भाजीपाला व फळ विक्री व्यवसाय करणाऱ्याना फक्त मत मागणीसाठी वापर करुन घेतलेला आहे असा आरोप व्यवसायिकां कडून केला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नगरसेविका हमिदा अनिस सुंडके अध्यक्ष वानवडी रामटेकडी क्षे.कार्यलय व नगरसेविका परविन हाजी फिरोज शेख सदस्य शहर सुधारणा समिती व माजी नगरसेवक रईस सुंडके व हाजी फिरोज शेख यांनी पुणे आयुक्ताना निवेदन दिले आहे.
या पाठपुराव्यामुळे अॕमिनिटी स्पेस जागावर भांजीमंडई व फळ बाजार उभारणी झाली तर या भागातील वाहतूक समस्या व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिलेलं.
आशा प्रतिक्रिया या भागातल्या नागरिकांमधून येत आहेत.