काँग्रेसच्या वतीने कोंडव्यात नागरीकांची स्वाक्षरी मोहीम.


स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक, निर्भीड, निरपेक्ष वार्तांकन- बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११


पुणे दि.१६ ऑक्टोबर- केंद्र शासनाने मंजूर केलेला कृषी कायदा हा शेतकरी हिता विरुद्ध असून तो रद्द करण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेली दोन कोटी स्वाक्षरी मोहीम कोंढवा येथे नागरिकांच्या सह्या घेऊन राबविण्यात आली.
 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे, पुणे शहर ओबीसी सेल काँग्रेसचे अध्यक्ष मा. साहील केदारी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.
 केंद्रशासनाने शेतकरी विरोधी कायदा पारित केला असल्याच्या कारणाने देशात कॉंग्रेसच्या वतीने दोन कोटी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार कोंढवा भागात काँग्रेस कार्यकर्त्यानी नागरीकांची स्वाक्षरी मोहीम आयोजित केली होती.

 यावेळी हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रो. शोहेब ईनामदार, महिला अध्यक्षा सौ. माया डुरे, अनु.जाती विभाग अध्यक्षा सौ. रिबेका कांबळे,अपंग सेल अध्यक्षा सौ. मिनाक्षी शिदे, उपाध्यक्ष मा. विजय इंगळे, सरचिटनीस सोहेल लांडगे, तसेच कोओडीनेटर ग्लाँडस डायस. सरचिटनीस मा. देवदास दत्तात्रेय लोणकर उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items