माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक ,निर्भीड , निरपेक्ष वार्तांकन- बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

पुणे जिल्हा माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

पुणे दि.१८-
कोरोनाच्या कालावधीत महिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल पुणे जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेंद्र सरग याना सूर्यदत्त चे संस्थापक  डॉ संजय चोरडिया यांच्या उपस्थित सुर्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      चीन पासून जगभरात कोरोना संसर्गाचा फैलाव सुरू असताना सर्वत्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 
आशा वेळी पुणे जिल्‍ह्यात ९ मार्चला २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्‍ण सापडला. आणि प्रशासनाची ही जबाबदारी वाढली.
दरम्यान २६ फेब्रुवारी पासूनच प्रशासनाच्‍या वतीने अचूक आणि तात्‍काळ  माहिती प्रसार प्रसारमध्यमा पर्यंत पोहोचवण्‍यात माहिती कार्यालय आघाडीवर राहिले.
सोशल मीडियावर अर्धवट आणि अफवांचे निराकरण  करण्यास व प्रसार माध्यमा मार्फत योग्य ती माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यात मदत होत गेली.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिटाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते सूर्यदत्त चे संस्थापक  डॉ संजय चोरडिया यांच्या उपस्थित सुर्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      राजेंद्र सरग याना  यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन२००३ चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार व दैनिक गांवकरी, औरंगाबाद तर्फे व्‍यंगचित्र क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामगिरी बद्दलचा सन २००४  गौरव पुरस्‍कार मिळाला.
       महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता व महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकाचा राज्यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेचा सन २००४ ते २००७ ४ वर्षे प्रथम पुरस्‍कार,आणि पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन २००७ चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार मिळालेला आहे.

त्याच प्रमाणे विश्‍व संवाद केंद्र आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटीच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २०१७ चा आद्य पत्रकार देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍क व राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, दैनिक रत्‍नभूमी, रत्‍नगिरी तर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये प्रथम पुरस्‍कार देण्यात आला.

ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २००८-२००९ चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार मििळाळा. परभणी येथील जनसहयोग संस्‍थेच्‍यावतीने देण्यात येणारा साहित्यिक क्षेत्रातील सन २०१२ चा ‘जननायक पुरस्‍कार मिळाला.

आकाशवाणी मुंबईच्‍या २०१५-१६ या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव झाला.
अहमदनगरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाचा साहित्‍य क्षेत्रातील अनमोल योगदाना बद्दल २०१७ मध्‍ये गौरव व नागपूर येथे २०१७ मध्‍ये आयोजित अखिल भारतीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रास उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे.

शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे.

याशिवाय त्‍यांनी रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्‍यात आले होते.
तर विविध दिवाळी अंकांत त्‍यांची ११ हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने