सोलापूर दि.१७-
सहा नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांचे सभासदत्व न्यायालयाने ही केले रद्द.
सविस्तर वृत्त असे की सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २१ चे एमआयएम चे नगरसेवक तौफिक इस्माईल शेख हे पालिकेच्या सभागृहात सभांना अनेक वेळा अनुपस्थित राहिले होते.
सतत पालिकेच्या सहा सभांना गैरहजर राहील्यामूळे मनपा आयुक्त सोलापुर यांनी शेख त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचे नोटीस द्वारे कळवले होते.
मनपा आयुक्तांच्या सभासद रद्द च्या निर्णया विरोधात वर तौफिक शेख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु न्यायायाने सुद्धा त्याचे सभासदत्व रद्द केले आहे.